खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहरातही आता कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी 7 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामध्ये एका खानापूर शहरात पाच तर उर्वरित दोन रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आता खानापूर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 360 इतकी झाली आहे.
गेल्या काही दिवसात खानापूर शहरात कोरोनाबाधित सापडण्याची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सापडलेल्या पाच कोरोनाबाधितामध्ये मिशन कंपाऊडमधील 43 वर्षीय महिला तसेच चिरमुरकर गल्ली येथील 31 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. सरकारी दवाखान्यात 50 वर्षीय व 39 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. गर्लगुंजी गावात देखील 58 वर्षीय पुरुषाला व नंदगड येथील 35 वर्षीय पुरुषाला कोरोना झाल्याचे आरोग्य खात्याच्या बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.