बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच त्यांची मुलंसुध्या चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असतात. तर काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलामुलींबद्दल अनेक किरकोळ गोष्टी देखील जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. यातीलच एक स्टारकिड खुशी कपूर असून लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
खुशी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची धाकटी कन्या आहे. खुशी ही सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणार सक्रीय असते. फोटो, व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. खुशीच्या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंती देखील मिळते.
खुशीने अलिकडेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. खुशीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोतील खुशीचा लुक चाहत्यांना घायाळ करत आहे. खुशीसोबत तिची बहिण जान्हवी कपूर देखील सोशल मीडियावर सक्रीय असून तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे.