प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा खोर्ली घाटेश्वर नगर येथे दुचाकी संरक्षक भिंतीवर आदळून गंभीर जखमी झालेल्या युवकाचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. सनत उमेश मोरजकर (वय 20, रा. एकतानगर हाऊसिंग बोर्ड) असे मयत युवकाचे नाव आहे.
याबाबत उपनिरीक्षक आशिष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार सनत हा आपल्या एमएच 04 एफजी 9540 या कावासकी निंजा गाडीने येत असता खोर्ली म्हापसा घाटेश्वरनगर उतरणीवर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने गंभीर जखमी झाला. 108 रुग्णवाहिकेतून त्याला म्हापसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून बांबोळी येथील गेमेकॉत नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेचा पंचनामा उपनिरीक्षक आशिष परब यांनी केला.