बेळगाव – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भीमाशंकर ते शिवनेरी या मोहिमेसाठी शेकडो धारकरी रवाना झाले शुक्रवारी रात्रीपासून बेळगाव शहर तसेच तालुका खानापूर या परिसरातून वाहनांमधून धारकरी भीमाशंकरच्या दिशेने रवाना झाले. 28 जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त महाराष्ट्र कर्नाटक व गोव्यातून शेकडो धारकरी सहभागी होणार आहेत शुक्रवारी बेळगाव परिसरातून शेकडो धारकरी भीमाशंकर चा दिशेने रवाना झाले पवार गल्ली शहापूर येथील वारणादेवी युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले त्याच सोबत मीरापूर गल्ली सराफ गल्ली लक्ष्मी गल्ली साठी शेकडो धारकरी विविध वाहनातून रवाना झाले. यावेळी जिल्हाप्रमुख किरण गावडे, नगरसेवक रवी साळुंखे,यावेळी नंदू कंग्राळकर, अनिल शिंदे, सुमंत जाधव रोहित भागोजी रोशन शिंदे संदीप शिंदे रोहन कंग्राळकर विकास लगाडे सुरज पोटे प्रसाद भातखंडे रोहित चिनन्नावर राजू आंबेवदीकर शिवम मंडोळकर, अजय पवार,सुजय प्रभू जयेश खराडे प्रकाश भातखंडे अजय पेपर विक्रम पोटे यासह शिवभक्त उपस्थित होते.
Previous ArticleKolhapur : सामाजिक बांधिलकी जपणारा उत्तम उपकार्यकारी अभियंता
Next Article गडकोट मोहिमेला शेकडो धारकरी रवाना