बुधवार-गुरुवारी धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद
बेळगाव :सैनिकनगर, लक्ष्मीटेक, गणेशपूर येथील तेजप्रतिबिंब पीठ, रुद्रकेसरी मठ सेवा समितीतर्फे जगद्गुरु सिद्धारुढ स्वामींचा नववा वार्षिक उत्सव समारंभ बुधवार दि. 3 व गुरुवार दि. 4 मार्च रोजी साजरा होणार आहे. यावेळी हरिगुरु महाराज व इतर स्वामींची उपस्थिती असणार आहे.
बुधवार दि. 3 रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत मठाची वास्तूपूजा व नवग्रह हवन होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 ते 5 पर्यंत अखंड गुरुपाठ स्मरण होईल. गुरुवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 6 ते 8 पर्यंत धार्मिक विधी होणार आहेत. त्यानंतर हरिगुरु महाराज यांच्या उपस्थितीत सकाळी 10 ते 1 पर्यंत प्रवचनाचा कार्यक्रम होईल. स्वामीजींच्या हस्ते दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भक्तांनी हार, फुले आणि श्रीफळ न आणता शिधादान करावे. तसेच भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करणे जरुरीचे आहे, असे रुद्रकेसरी मठ सेवा समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.