वार्ताहर / मडकई
कोरोना लसीकरणासाठी 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील युवकांनी लस घेण्याचे आवाहन सरकार करीत आहे. लसीचा कोटा उपलब्ध असतीलच याची खात्री नसल्याचा संशय उपस्थित होतो. त्यासाठी सरकारने नविन योजना सुरू करून काही निधी जमवीण्याची आवश्यकता आहे. धनिक नागरिकांनी लस टोचून घेताना गरिबांच्या दोन डोसच्या व्यवस्थेरूपी रू 1200 सरकारच्या खात्यात जमा करावे. यातून ऑक्सीजन व व्हॅटीलेटरचा खर्चाला मदन होईल व रूग्णांना जीवदान मिळेल अशी सुचना मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
गोव्यातील प्रत्येक उपजिल्हा रूग्णालयात लसीसाठी सरकारने हे खास खाते उघडावे. लस घेण्यासाठी येणारे श्रीमंत व उद्योजक स्वतःसाठी लस घेताना इतर गरजू व्यक्तीचा भार उचलेल. अशी योजना करणे काळाची गरज आहे.
दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचाही दर कमी होत नसल्याने नागरिक बिथरलेले आहे. हा संसर्ग रोखून धरण्यासाठी 15 दिवसांचे लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पून्हा अधोरेखीत केले आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपाचे अध्यक्ष श्री तानावडे, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी बोललेलो असल्याचे त्यांनी या परिषदेतून सांगितले. नागरिक जीवंत राहीले तरच संपत्तीला महत्त्व आहे. अन्यथा ते काय कामाचे असा सवाल करून आमदार सुदिन ढवळीकर यांनी लॉकडाऊनच्या काळात जनतेने काळजी घेऊन स्वतःचे जिवन सुरूक्षीत ठेवण्याचे आवाहन केलेले आहे.