क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मौजे गर्लगुंजी, खानापूर येथे न्यू मराठा स्पोर्ट्स क्लब गर्लगुंजी आयोजित भव्य कब्ब्डी स्पर्धेचे आयोजन शनिवारी 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा मुलां-मुलींकरीता खुली असून एकाच गावातील खेळाडू असणे गरजेचे आहे. त्यामध्ये 60 किलो वजनाचे 5 व 65 किलो वजनाचे 2 खेळाडू असणे गरजेचे आहे. मुलांच्या गटात विजेत्या संघाला 21 हजार 1 रूपये व आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला 11 हजार 1 व चषक, तर तिसरे बक्षीस 7 हजार 1 रूपये व चषक देण्यात येतील. त्याचप्रमाणे उत्कृष्ट रायडर, उत्कृष्ट कॅचर, व अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. मुलींच्या गटातील विजेत्या संघाला 15 हजार 1 व आकर्षक चषक, उपविजेत्याला 10 हजार 1 व चषक तर तिसऱया क्रमांकासाठी 7 हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट रायडर, उत्कृष्ट कॅचर, अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येतील. इच्छुकांनी न्यू मराठा स्पोर्ट्स गर्लगुंजी यांच्याशी संपर्क साधावा.