पूर्वी चाक्षुस मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवाने यज्ञ केला. सर्व देव उपस्थित, स्वरा नावाच्या पत्नीस अवाहन केले पण ती वेळेवर येऊ शकली नाही. ब्रह्माने गायत्री म्हणजे गवळणीसह यज्ञ सुरू केला. स्वरा तेथे आली गायत्रीला बघून संतापली शाप दिला ‘जड होशील’ गायत्रीने पण स्वराला शाप दिला ‘जड होशील’. जड म्हणजे जल देवांनी दोघींना जलरूपाने प्रकट व्हा असा आदेश दिला अशा या सावित्री व गायत्री नद्या…अजमेर पुष्करतीर्थावर मंदिर आहे.
सरस्वती….देवी आणि नदी दोघीची नावे म्हणजे सरस्वती. लक्ष्मी, गंगा, सरस्वती या विष्णुच्या पत्नी. ब्रह्म वैवर्तपुराण, देवी भागवत यात उल्लेख. सरस्वती ब्रह्म देवाची कन्या. गंगा हिमालयाची कन्या मोठं कोण यावरून भांडण. दोघींनी एकमेकींना शाप दिले. दोघीही पृथ्वीवर नदीरूपात वाहू लागल्या.
कथा…. एकदा पुरूरवा राजाने सरस्वतीला पाहिले, तिच्या सौंदर्याने मोहित झाला. आपली प्रिया उर्वशीला, सरस्वतीला घेऊन यायला सांगितले. उर्वशिने त्याप्रमाणे केले. ब्रह्माने रागावून सरस्वतीला शाप दिला. पृथ्वीवर नदी होऊन वाहायला लागली. वाटेत खूप सरोवरे निर्माण झाली म्हणून सरस्वती.
कथा…..वडवाग्नीने भूतलावर प्रलय मांडला, देव दानव होरपळू लागले. त्याला बंदिस्त करून ब्रह्माने एका पात्रात भरले व सरस्वतीला ते समुद्राकडे पोचवायला सांगितले. तिला तो दाह सहन न झाल्याने ती जलरूपात वाहू लागली. पश्चिम समुद्र गाठला, प्रभास क्षेत्रात वडवानलाचे विसर्जन केले व शापमुक्त झाली. शिवाकडून ब्रह्महत्या घडल्यावर तो सरस्वती नदीत स्नानाला आला पण सरस्वती अचानक गुप्त झाली…(वामन पुराण)
सरस्वती आकाशात वाहते व शेवटी वरूणाच्या मुखात पडते. ती अत्यंत वेगवान असून प्रजापतीने तिला निर्माण केलंय. पर्वतावर उगम पावून सागराने जाताना ती राजपुतान्यातल्या वाळवंटात अडकून पडली.