फोंडा तालुक्यात सहा हजार नोंदण्या : सर्वाधिक मजूर उत्तर प्रदेशमधील
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनमुळे बांधकाम व औद्योगिक क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱया मजुरांना आपल्या गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यासाठी नोंदणी करणाऱया मजुरांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात 80 हजारांहून अधिक मजूर आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. फोंडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमध्ये आत्तापर्यंत 6 हजारांच्या आसपास मजुरांनी गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. या शिवाय ऑनलाईनद्वारेही बऱयाच मजुरांनी नोंदणी केली आहे.
उसगाव पंचायतीमध्ये एक हजारहून अधिक नोंदणी
उपजिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊनच्या काळात ज्या मजुरांनी जेवण व इतर सुविधांसाठी नावनोंदणी केली आहे, त्यांचा आकडा 14 हजारांहून अधिक आहे. त्यापैकी साधारण 70 टक्के कामगार गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत. फोंडा तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक एक हजारच्या आसपास नोंदण्या उसगांव-गांजे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आहेत. त्यानंतर कुर्टी खांडेपार पंचायतीमध्ये 750, बांदोडा पंचायतीमध्ये 600, भोम 623, बेतकी-खांडोळा 600, तिवरे-वरगाव 405, कुंडई 450, मडकई 300, शिरोडा 334, बोरी 283 अशी आत्तापर्यंत नावनोंदणी केलेल्या मजुरांची यादी आहे. पंचायत कार्यालयांच्या बाहेर लागणाऱया रांगा व ऑनलाईन नोंदणी लक्षात घेतल्यास हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मजूर गावी गेल्यास त्याचा फोंडा तालुक्यातील बांधकाम व्यवसायाबरोबरच मान्सूनपूर्व कामावर परिणाम होणार आहे. फोंडा तालुक्यातील कुंडई, मडकई, बेतोडा, उसगांव या औद्योगिक वसाहतींमध्येही रोजंदारीवर कामावर असलेला मजूरवर्ग मोठय़ा संख्येने स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे.
सर्वाधिक मजूर उत्तर प्रदेशमधील केवळ फोंडा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावी जाण्यासाठी नोंदणी केलेल्या कामगारांची आत्तापर्यंतची संख्या 5747 एवढी आहे. त्यामध्ये सर्वाधिक 1969 मजूर हे उत्तरप्रदेशमधील आहेत. बिहारमधील मजुरांची संख्या 972 तर झारखंडमधील मजुरांची संख्या 554 एवढी आहे. याशिवाय ओडिशा, पश्चिम बंगाल व कर्नाटक राज्यातील बऱयाच मजुरांनी गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. काही कामगार नेपाळमधील आहेत.