मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच लक्षवेधी शीर्षक आणि आशयघन कथांवर चित्रपट बनत असतात. याच कारणांमुळे जगभरातील सिनेप्रेमींचं मराठी सिनेसृष्टीकडे लक्ष लागलेलं असतं. शीर्षकापासून कथानकापर्यंत बऱयाच गोष्टींमध्ये उजवा असलेला ‘गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’ हा आणखी एक मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक शुभम रे यांनी या चित्रपटाची घोषणा करत ‘गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’चं टायटल सोशल मीडियावर प्रदर्शित केलं आहे. शीर्षकावरून या चित्रपटात काहीसं गंमतीशीर कथानक पहायला मिळणार असल्याची चाहूल लागते. चित्रपटाचा चेहरा असलेलं क्रिएटिव्ह टायटल ही लक्ष वेधून घेणारं आहे. झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक सटायर पहायला मिळणार आहे. यात समाजव्यवस्था आणि जनतेची मानसिकता यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केल्याचं दिग्दर्शक शुभम यांचं म्हणणं आहे. प्रत्येक स्तरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या कथेशी एकरूप होईल तसेच पोट धरून हसतीलही असा विश्वास शुभम रे यांनी व्यक्त केला आहे.
Previous Article‘खासगी’तील 50 टक्के बेड्स ताब्यात घ्या : शोभा करंदलाजे
Next Article विकेंड कर्फ्यूतही उडुपी जिल्हय़ात लग्नसोहळय़ांचा धडाका
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.