ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारत सरकार आणि फेसबुक, व्हॉट्सअप, इन्सटाग्राम, ट्विटर या सोशल मिडीया माध्यमांमध्ये नियमावलीच्या मुद्यावरुन अनेक वेळा ताण – तणाव निर्माण झाल्याचं यापूर्वी अनेकदा घडलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गुगलविरुद्ध भारतात चौकशीचे आदेश लागू करण्यात आले असून ही चौकशी ऑनलाइन जाहिराती व अॅप डेव्हलपर्सकडून प्ले स्टोअरच्या नावाखाली मनमानी कमिशन उकळल्याप्रकरणी सुरू आहे.
सर्च इंजिन गुगल आपल्या क्षेत्रात एकाधिकारामुळे भारतातही अपलाभ घेत आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या (डीएनपीए) तक्रारीनंतर सकृतदर्शनी प्रतिस्पर्धा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे सीसीआयने मान्य केले आहे.आयोगाने ताज्या आदेशात मान्य केले आहे की, गुगल एकाधिकाराचा दुरुपयोग करून डिजिटल न्यूज पब्लिशर्सवर अयोग्य अटी लादत आहे.
गुगलविरुद्धच्या तक्रारीनुसार, एखादी माहिती सर्च केल्यानंतर गुगल न्यूजसारख्या प्लॅटफॉर्मवरही ती पब्लिशर्सचाच कंटेंट दाखवून कमाई करते आहे. याऐवजी गुगलने सर्च केलेला कन्टंट दाखवणे अपेक्षित असाताना गुगल ती पद्धत अवलंबत नसल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.