नवी दिल्ली : गुगल मीट ऍपवर ऑनलाईन शिक्षणासाठी आता नवीन सुरक्षित आणि एंगेजमेंट फिचर्स प्राप्त होणार आहेत. गुगलने दिलेल्या माहितीनुसार या फिचर्सच्या मदतीने शिक्षण घेण्यासाठीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अधिक सक्षम राहणार असल्याचे संकेत आहेत. आता टीचर्स मीटिंग समाप्त झाल्यानंतर सर्व कॉल एकाचवेळी जोडता येणार आहेत. आता शिक्षकाच्या कॉलमधून बाहेर पडल्यानंतर अभ्यासिका रुम सोबतही जोडता येणे शक्य होणार आहे. येणाऱया आगामी काही आठवडय़ात ‘म्यूट ऑल’ फिचर्स मिळणार असल्याची माहिती आहे.
कधी कधी न थांबता अभ्यास सुरु ठेवण्याची आवश्यकता असते. यासाठी आम्ही काही महिन्यातच असे फिचर्स लाँच करणार असल्याचे गुगल मीटचे उत्पादक मॅनेजर जेनिफर शेन यांनी सांगितले आहे. अधिकची फिचर्स देण्याचा यापुढे प्रयत्न राहील.