पाच पाकिस्तानी तस्करांना अटक
गांधीनगर / वृत्तसंस्था
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी दल याच्या संयुक्त मोहीमेत एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली असून त्यातून 176 कोटी रूपयांचा हेरॉईन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सोमवारी केलेल्या या कारवाईत पाच पाकिस्तानी तस्करांना अटक करण्यात आली आहे.
गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या पाकिस्तानी बोटीवर गुप्तचरांचे आधीपासूनच लक्ष होते. ही बोट तिच्या निर्धारित स्थानी येताच छापा टाकण्यात आला. अनीस (30), इस्माईल मोहम्मद कच्छी (50), अश्रफ उस्मान कच्छी (42), करीम अब्दुल्ला (37) आणि अबुबकर अश्रफ सुमरा (55) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.