वार्ताहर/ येडूर
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून सीमाभागात अग्रेसर असलेल्या गुरुदत्त शुगर्सतर्फे टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 50 हजार सिरींज देण्यात आली. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संजय गायकवाड, तालुका वैद्याधिकारी डॉ. धनंजय दातार, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐनापुरे, सरपंच हर्षदा पाटील, उपसरपंच सूदर्शन भोसले, गावकामगार पोलीस पाटील सुनीता पाटील, डेप्युटी एचआर मॅनेजर सी. डी. पाटील, डॉ. मनोज गायकवाड, जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले, सुरक्षा अधिकारी शामराव पाटील यांच्यासह ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.