आपल्या सभोवताली सहज मिळणाऱया गोष्टींतून गृहसजावट उत्तम करू शकतो. फक्त त्यासाठी कल्पक वृत्ती जोपासण्याची गरज असते. त्याचप्रमाणे चांगलं काय ते ओळखण्याची दृष्टी असावी लागते.
उत्तम रचनेतलं बांधकाम घराचा मुख्य घटक असतो. घराच्या रचनेनुसार सजावट करणं कधीही सोपं ठरतं. घराची अंतर्गत सजावट ही प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे. अंतर्गत मांडणीत मजबुत फर्निचर आणि लाकडी कामातून साकारलेल्या अनेक गोष्टींना सामावून घेतलं जातं. हे करताना घराच्या सजावटीचा मुख्य गाभा हरवून बसणार नाही ही काळजी घ्यावी लागते. अर्थात उत्तम डिझाइनचं फर्निचर आणि उत्तम लाकडी वस्तुंची गरज ही घरासाठी महत्त्वाचीच असते. एखाद्या गृहिणीच्या मोकळय़ा कपाळावर जेव्हा बिंदी लावली जाते तेव्हा त्या कपाळाचे रूप उजळते. तसेच काहीसे घराच्या अंतर्गत सजावटीबाबतीतही असते. सजावटीत फर्निचरचा समावेश करताना ते महागडं घ्यायला पाहिजे असं काही नसतं. फर्निचर घेताना आपल्याला बसण्यास आरामदायी हवं, हा घटक महत्त्वाचा. थीम पसंतीतून साकारलेली थीम गृहसजावट वेगळा भाव खाऊन जातात. पण काहीदा एखाद्या थीमचा ठराविक महिने, वर्षानंतर घरातल्या सदस्यांना कंटाळा वाटू लागतो. मग पुन्हा थीम बदलायचा डोक्यात घोळ सुरू होतो. तेव्हा आपली घराची सजावट साध्यातल्या साध्या गोष्टींतून साकारली जाण्याला प्राधान्य देता येतं. आपल्याला साधेपणात जास्त आनंद वाटत असेल तर भिंती रंगवण्याऐवजी ब्रिकवर्क (उघडय़ा विटांची भिंत) प्रकारातील भिंती अधिक छान शोभतात.
आपल्या सभोवताली सहज मिळणाऱया गोष्टींतून गृहसजावट उत्तम करू शकतो. फक्त त्यासाठी कल्पक वृत्ती जोपासण्याची गरज असते. त्याचप्रमाणे चांगलं काय ते ओळखण्याची दृष्टी असावी लागते.
प्रवेशदारापासून घराच्या सजावटीची सुरूवात करू शकतो. मोठय़ा प्रेमचा आरसा प्रवेश मार्गावर लावल्यास तसेच त्याला म्युरल्सची साथ मिळाल्यास उत्तम दिसेल. आरसा आणि प्रेम या दोन्ही गोष्टी उठून दिसणाऱया, डिझाइनमध्ये वेगळेपण जपणाऱया असतील हे पाहा. बाजारात आपल्याला आरशांमध्ये असंख्य व्हरायटी पाहायला मिळतील.
लिव्हिंगरूमची सजावट करताना भिंतीवर अधिक लक्ष केंद्रीत करून त्या सुंदरपणे सजवण्याचा प्रयत्न करता येतो. सोफ्यामागील भिंतीवर वॉलपेपर किंवा पेंटींग छान दिसेल. इथनिक लुकसाठी पितळेच्या प्लेटस्ची मांडणी, एखादं सुंदर कार्पेट सिल्कचे प्रेम करून भिंतीवर लटकवता येते. नाहीतर एरवी आपण एखादं पेंटींग लावतो. तेव्हा याबाबतीत जरा वेगळा विचार आत्मसात करता येतो.
आपल्या घरात मोठं सेंटर टेबल असेल तर त्यावर कॉफी टेबल बुक्सची रचना करता येते. भिंती अगदीच उघडय़ा वाटत असतील तर विविध आकाराच्या प्रेमच्या फोटोंनी मजा आणता येते. सोबत वॉल लॅम्पची सोय केल्यास उत्तम ठरेल. भिंतीच्या एका कोपऱयात हवं तर एखादी मोठी फुलदाणी आणि त्यात कोरडी फुले लावून तो भाग उठावदार करता येतो. बाजारात गेल्यास आपल्याला असंख्य व्हरायटी, रंगसंगतीतील मोठय़ा आकाराच्या मातीच्या, सिरॅमिकसह इतर साहित्याच्या कुंडय़ा वा फुलदाण्या खरेदी करता येतात. त्याला अनुसरून कृत्रिम फुले घेतल्यास उत्तम ठरू शकते.
आता या खोलीचा गाभा असलेल्या फर्निचर अर्थात सोफासेटकडे वळू. सोफ्यावर उजळणाऱया उशा जरूर ठेवा. जुन्या सिल्क साडय़ांचे कव्हर्स शिऊन घेता आले तर त्यांनी उशांचे रूप खूपच उजळून निघेल. त्याचप्रमाणे डायनिंग टेबलावर उजळत्या रंगातील रनर्सची मांडणी प्रसन्नता आणणारी ठरेल. सोबत कँडल स्टँडसह मेणबत्त्या आणि औषधी वनस्पतींनी युक्त छोटय़ा कुंडय़ा ठेवता येऊ शकतात.
मुलांची वेगळी खोली असेल तर त्यांच्या छतावर (सीलिंग) वेगवेगळी स्टीकर्स चिकटवता येतात. मास्टर बेडरूम फॅमिली फोटोंसह आणि उजळत्या रंगातील पडद्यांसह सजवता येते.
एवढं सगळं करताना प्रकाशयोजनेकडे दुर्लक्षू नका म्हणजे झालं. आवश्यकतेप्रमाणे प्रकाशयोजनेची गरज आवश्य पूर्ण करून घ्या. एखादं सुंदर पेंटींग असेल तर त्यावर फोकल लाइट आवश्यकच. एखादे सुंदर शिल्प असेल तर त्यासाठीही वेगळय़ा दिव्याची स्वतंत्र सोय करणे गरजेचे असते. कशाला खर्च म्हणून ही बाब दुर्लक्षिल्यास सजावटीत या बाबी नकारात्मक वाटू लागतात. खोल्यांमध्ये पुरेसा उजेड पुरवण्याचे काम काहीदा फ्लोअर लॅम्प मिळवून देतात. लिव्हिंगरूममध्ये फ्लोअर लॅम्पची सोय करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. साइड लॅम्प बेडरूममध्ये खोलीचा उबदारपणा वाढवतात. अशा पद्धतीने गरजेनुसार आवश्यक ती प्रकाशयोजना जरूर करून घराचा कायापालट करता येतो.