ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात आज फेरबदल होणार असून, 15 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये 11 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्री असतील. कॅबिनेटमध्ये 8 तर राज्यमंत्रिपदासाठी 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा होणार आहे.
हेमाराम चौधरी, महेंद्रजित सिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश बैरवा, भजनलाल जाटव, टिकाराम जुली, गोविंदराम मेघवाल, शकुंतला रावत हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर जाहिदा, बृजेंद्र सिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीणा हे राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद संपुष्टात आल्याने दोन्ही गटातील नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. गेलहोत यांच्या निवासस्थानी शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला होता.