पुलाची शिरोली / वार्ताहर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर्स पॅकेजच्या माध्यमातून संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठसंचालक अरुण नरके यांच्या हस्ते साठ लाख रुपयांची नुकसान भरपाईचे धनादेश वाटप शनिवारी करण्यात आले.
सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वञ लॉकडाऊन असतानासुध्दा माहे एप्रिल २०२० पासून आजअखेर ६० लाख रुपयांची नुकसान भरपाई या पॉलिस अंतर्गत देण्याचे काम गोकुळ दूध संघ व दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनीने केले आहे.
या योजनेत सहभाग घेतलेले यशवंत सहकारी दूध संस्था पुनाळ, ता.पन्हाळा संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी कै.विलास मारुती पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला तसेच दत्त सहकारी दूध सांगरुळ,ता.करवीर दुध संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी कै. तानाजी शिवाजी वाघवेकर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्यामुळे या फार्मर्स विमा पॅकेज योजनेतुन प्रत्येकी रुपये एक लाख रुपयाचा अपघाती विमा मिळाला असून हनुमान दूध संस्था मौजे वडगांव, ता.हातकणंगले या दूध संस्थेतील १३ दूध उत्पादक शेतक-यांच्या जनावरांचा मृत्यु झाल्यामुळे प्रत्येकी ४० हजार रुपये प्रमाणे ५ लाख २० हजार रुपये, साईबाबा दूध संस्था चौधरवाडी,ता.गगनबावडा २ दूध उत्पादक शेतक-यांच्या जनावरांचा मृत्यु झाल्यामुळे १ लाख रुपये असा ८ लाख २० हजार रुपये विमा रक्कमेच्या धनादेशाचे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सभेचे अध्यक्ष गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा.श्री.अरुण नरके यांच्या हस्ते यामध्ये दोन दुभती जनावरे, दूध उत्पादक शेतकरी (पती-पत्नी), राहते घर, वासरु संगोपन योजने अंतर्गत असणारी दोन वासरे व बायोगॅस यांना विमा सुरक्षा दिली जाते.
दि न्यू इन्डिया एश्योरंन्स कंपनीमार्फत देणेत येणारी किसान विमा पॉलिसी ही दोन प्रकारे दिली जाते त्यातील रुपये ७७० इतक्या किमतीस दिल्या जाणा-या पॉलिसीमध्ये रुपये ४६२ हे दूध उत्पादकांनी भरावयाचे असून त्यात समान दहा हप्ते करुन दूध बिलातून घेणेची सवलत दिली आहे. उर्वरीत रक्कम रुपये १५४ दूध संस्थेमार्फत व रुपये १५४ हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जातात तर दुसरी पॉलिसी रुपये १६०० इतक्या किमतीस दिली जाते त्यापैकी रुपये ९६० हे दूध उत्पादकांनी भरावयाचे असून त्यातही समान दहा हप्ते केले आहेत. उर्वरीत रक्कम रुपये ३२० दूध संस्थेमार्फत व रुपये ३२० हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जात असून पॉलिसी अंतर्गत दोन दुभत्या जनावरांकरीता ७७० रुपयाच्या पॉलिसी करीता २० हजार रुपये तर १६०० रुपयाच्या पॉलिसीकरीता ४० हजार रुपये, पती-पत्नीस अपघाती विमा कवच १ लाख रुपये, राहत्या घरास १ लाख रुपये, दोन वासरां करीता प्रत्येकी रुपये ५ हजार व गोबर गॅसकरीता रुपये २० हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे.