2000 वर्षांपासून होतेय ‘संजीवनी बूटी’चे उत्पादन
एखादा व्यक्ती मधासारखा गोड असल्याचे लोक म्हणत असतात. परंतु इटलीच्या सार्डिनियाच्या बेटावरील मध कडू चवीचे असते. सार्डिनियन मधाला कॉर्बेजेलो मध या नावाने ओळखले जाते, जे प्रामुख्याने इटलीच्या सार्डिनिया बेटावर मोठय़ा प्रमाणात प्राप्त होते.
हजारो वर्षांपासून या मधाचे उत्पादन घेतले जाते. कॉर्बेजेलो मध हे कॉर्बेजेलो रोपंच्या फुलांपासून प्राप्त होते. याला इंग्रजीत स्ट्रॉबेरीचे रोप म्हटले जाते. हे मध तयार करणे अत्यंत अवघड काम आहे. कॉर्बेजेलो फूल शरद ऋतूदरम्यान फुलू लागतात. त्यांना अत्यंत विशेष हवामानाची गरज भासते. तसेच अधिक पावसाची आवश्यकता असते. त्यानंतर या फुलाचा आकार बेलाच्या आकाराचा असल्याने मधमाशांना यात शिरण्यास अडचण होते.
अत्यंत उपयुक्त मध
अनेक कारणांमुळे कॉर्बेजेलो मध जगातील सर्वात दुर्लभ मधांमध्ये सामील आहे आणि हे अत्यंत कमी प्रमाणात मिळविले जाते. याचा स्वाद माणसाला कडवट जाणवतो. हे मध्य कडू चवीचे का असते हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु काही जाणकारांनुसार याचा कडवटपणा ग्लाकोसाइड आर्ब्यूटिन नावाच्या पदार्थामुळे तयार होतो. हे मध संजीवनी बूटीप्रमाणे असते. यात आरोग्यासाठी अनेक लाभदायक गोष्टी आहेत. यात व्हिटॅमिन, मिनरल्स असतात. तसेच झोपची समस्या दूर करण्यास हे मध उपयुक्त आहे. खोकला, कफाचा त्रास कमी करण्यास हे मध प्रभावी आहे.