सोनीपत
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांनी आता आपले प्रकल्प इतर राज्यातही उभारण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत गोदरेजने हरियाणात सोनीपतमध्ये 50 एकर जागेची खरेदी केली आहे. दिल्ली-एनसीआर भागात जमीन खरेदीचा गोदरेजचा हा दुसरा व्यवहार आहे. याआधी 2020 मध्ये फेबुवारीत राष्ट्रीय राजधानीत प्रकल्प विकासासाठी 27 एकर जमीन खरेदी केली होती.