प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डा-मडगाव येथील सौ. रोशना अमित वेर्णेकर या गोमंतकीय कन्येचा अमेरिकेत हल्लीच गौरव करण्यात आला. रोशना वेर्णेकर ही मिसेस भारत ओहायो-2019 ब्युटी पेजेंटची विजेता आहे आणि सद्या मिसेस भारत ओहायो ब्युटी पॅजन्टच्या प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत.
रोशना वेर्णेकर या फातोर्डा येथील डॉ. प्रिमानंद आणि श्रीमती ज्योती वर्णेकर यांची सून, श्री अमितची पत्नी आणि रोहन व अर्णव यांची आई. श्री. प्रमोद आणि श्रीमती पुष्पा पावसकर यांची कन्या आहे. रोशनाने 2020ची आंतरराष्ट्रीय टोस्टमास्टर वक्तृत्व भाषण स्पर्धा जिंकली असून अर्नोल्डच्या स्पोर्ट ट्रायथलॉन पदकाची ती विजेती आहे.
मिसेस भारत ओहायो पेजेन्ट जिंकण्याच्या तिच्या कामगिरीबद्दल आणि समाजसेवेच्या तिच्या अथक परिश्रमांसाठी रोशना हिचा ओहायोच्या राज्यपाल श्री माइक डीवाइन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. पॅट डेवाइन यांनी आयोजित केलेल्या आशियाई एनआरआय सत्कार डिनरमध्ये आमंत्रित केले होते. जिथे वरील उल्लेखलेल्या मान्यवरांनी तिनें केलेल्या कामगिरीचे कौतुक करून तिचा गौरव केला होता.
स्वतः एक एनआरआय गोवन म्हणून तिने कोलंबसच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजात, अनिवासी भारतीयांचे आणि भारतीय उद्योजकांचे योगदान आणि महत्त्व अधोरेखित करण्याची जबाबदारी घेतली. सौ. रोशना अमित वेर्णेकर हिने वंचित महिलांच्या दुर्दशावर सक्रियपणे प्रकाश टाकला आणि वेगवेगळय़ा कार्यक्रमांद्वारे त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचे योगदान दिलेले आहे.
तिने राज्यपालांना अभिमानाने सांगितले की, ती भारतातील गोवा राज्यातील रहिवासी आहे. गोवा राज्य हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ते नैसर्गीक सौंदर्य आणि सांस्कृतिक, पारंपारिक वारशांनी सजलेले आहेत. कोलंबस येथे आयोजित केलेल्या आशियायी इंटरनॅशनल फेस्टिव्हल मध्ये गोव्यातील सांस्कृतिक, पारंपारिक मूल्ये, पर्यटन उद्योग, गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य याबद्दल माहिती देण्यासाठी भारतीय पॅव्हेलीयनमध्ये रोशनाने गोवा राज्य मंडळाचे प्रतिनिधित्व केले.
बॉलिवूडच्या टॉप डिझायनर श्रीमती कीर्ती राठोड यांनी न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये तिच्या उत्कृष्ट डिझाइन संग्रहासाठी चालण्यासाठी रोशनाला खास आमंत्रित केले. मिशिगन फॅशन वीक इंटरनॅशनलमध्ये तिला पाच आंतरराष्ट्रीय डिझाइनर्सनी देखील कॅटवॉल्क साठी आमंत्रित केले होते.
सध्या असलेल्या कोरोना लॉकडाउन मध्ये रोशना आणि तिचे स्वयंसेवक कार्यकरते गरजूं लोकांसाठी विनामूल्य मास्क तयार करून वाटणाच्या कामात सक्रियपणे गुंतले आहेत. रोशना आणि तिची स्वयंसेवकांची टीम कोलंबसमधील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी फोन करते. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोचवण्यासाठी तिने आणि तिच्या स्वयंसेवकांनी निधी व देणग्या जमा केल्या. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी आणि लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टंसिन्ग संदेश देण्यासाठी तिने ऑनलाइन इव्हेंट आणि कार्यक्रम आयोजित केले. या प्रोग्राम्समुळे लोक कोरोना लॉकडाऊनमुळे सक्रियपणे एकमेकांशी संवाद साधू शकतात ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंतेचेचा विसर पाडण्यात मदत होते.