साहित्य : सारणः अर्धी वाटी कोबी खिसून, अर्धी वाटी मटार, 2 चमचे बीन्स, 1 वाटी पनीर खिसून, 2 चमचे रेड चिल्लीसॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा काळीमिरीपूड, अर्धी वाटी चीज खिसून, 8 ते 10 लसूण पाकळय़ा चिरून, तेल तळण्यासाठी, पारीसाठीः दीड वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ, 2 चमचे तेल, पाणी आवश्यकतेनुसार
कृती : गरम तेलात लसूण टाकावी. नंतर कोबी, बीन्स आणि मटार टाकून 5 ते 6 मिनिटे परतवून शिजवून घ्यावे. नंतर त्यात मीठ, चिल्लीसॉस, टोमॅटो सॉस आणि काळीमिरीपूड टाकावी. आता पनीर मिक्स करावे. मिनिटभर मिश्रण परतवून आच बंद करावी. नंतर चीज मिक्स करून सारण तयार करावे. बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात इतर साहित्य मिक्स करून गोळा मळून पंधरा मिनिटे ठेवावा. नंतर त्याचे गोळे बनवून पारी लाटावी. त्यात सारण भरून त्याच्या कडा चौकोनी आकारात दुमडाव्यात. नंतर गरम तेलात सोनेरी रंगावर तळून पेपरनॅपकीनवर काढाव्यात. तयार गोल्डन पॉकेट्स सॉससोबत खाण्यास द्या.