स्पर्धेची अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील तरुण पिढीला जुन्या गाण्यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने रसिक रंजनच्या माध्यमातून गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावषी या स्पर्धेची अंतिम फेरी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धकांबरोबरच त्यांच्या पालकांनाही या स्पर्धेविषयी उत्कंठा लागली आहे. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे ही स्पर्धा होणार आहे.
1970 च्या दशकातील गाणी आजही रसिकांमध्ये रुळली आहेत. ही गाणी नवीन पिढीला समजावीत, यासाठी रसिक रंजन दरवषी स्पर्धेचे आयोजन करते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी प्रस्तुत व रसिक रंजन आयोजित गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावषीच्या स्पर्धेमध्ये अनेक युवकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी निवडक गायकांना अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली. या स्पर्धेसाठी तरुण भारत मीडिया पार्टनर असून, हॉटेल समुद्र हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहे.
गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम 2021 च्या अंतिम फेरीचा आनंद घेण्यासाठी रसिकांना प्रवेश तसेच लकी ड्रॉ पास देण्यात येणार आहे. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर व गुरुवारपेठ टिळकवाडी येथील लोकमान्यच्या मुख्य शाखेमध्ये हे पास उपलब्ध असणार आहेत. बेळगाव रसिक रंजनचे सदस्य व रसिकांनी या केंद्रांपैकी कोणत्याही एका केंद्रात जाऊन पास गोळा करायचा आहे. प्रवेश पास विनामूल्य असून रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे रसिक रंजनतर्फे कळविण्यात आले आहे.
प्रथम येणाऱयांना प्राधान्य एका क्यक्तीला जास्तीत जास्त दोन पास दिले जातील. कोणत्याही व्यक्तीला एंट्री कम लकी ड्रॉ पासशिवाय हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने प्रथम येणाऱयांना प्राधान्य दिले जाणार आहे. रसिकांनी पासवर विचारल्याप्रमाणे वैयक्तिक तपशील भरावयाचा असून तो लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकायचा आहे. स्पर्धेच्या शेवटी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. पास व इतर माहितीसाठी परशराम माळी 9886694672 किंवा श्रेया हुद्दार 94482 94539 या क्रमांकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.