प्रतिनिधी/ बेळगाव
गोल्ड्स जीम बेळगाव यांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अभिनेते राज के. पुरोहित यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
शिवाजी महाराजांनी तरुण वयात हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दाखविली. हा आजच्या तरुणांसमोर सर्वात मोठा आदर्श आहे. तरुणांनी हा आदर्श घेऊन समाजासाठी कार्य करावे, असे आवाहन अभिनेता राज के. पुरोहित यांनी केले. यावेळी गोल्ड्स जीमचे प्रमुख राहुल पोटे, आशा पोटे, अफ्रोज ताशिलदार, अश्विनकुमार, ललित शर्मा, गौरव अनगोळकर, लक्ष्मण हुंदरे, विशाल भातकांडे, ओम भंडारी, सूरज भंडारी, सूरज चौगुले, वैशाली सावंत, भरतेश चव्हाण, आराध्या कारूडेकर, प्रणय कंग्राळकर, श्रावणी कंग्राळकर व इतर सदस्य उपस्थित होते.