ट्रक्सी मालक संघटनेचा निर्धार
प्रतिनिधी /पणजी
गोवा माईलस् रद्द केल्या शिवाय टॅक्सी मालक मिटर बसविणार नसल्याचे टॅक्सी मालक संघटनेने जाहिर केले आहे. टॅक्सी मालक संघटनेने ट्रक्सी मालक आंदोलनाची सुत्रे आता बस मालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर यांच्या हाती दिली असल्याचे टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.
काल मंगळवारी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परीषदेत बाप्पा कोरगावकर बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत सुदीप ताम्हणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अगोदरच कोरोना मुळे टॅक्सी व्यवसाय डबघाईला आला असताना सरकारने टॅक्सी मालकांना आणखीन नुकसानीत ढकलू नये असेही कोरगावकर म्हणाले.
राज्यातील टॅक्सी मालक पर्यटकांना सुटत असल्याचा आरोप केला जातो मात्र यात किती सत्य आहे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. असे सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले. एखादा टॅक्सी चालक पर्यटकांना लुटीत असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी सगळ्याच टॅक्सी मालकांना वेठीस का धरले जाते असा प्रश्न ताम्हणकर यांनी उपस्थित केला आहे, टॅक्सी मालकांना विश्वासात घेण्या अगोदरच टॅक्सी मालकांना डिजीटल बसविण्याची सक्ती करणे हा टॅक्सी मालकांवर अन्याय नाही का असेही ताम्हणकर म्हणाले. इतर राज्यातून येणाऱया टॅक्सींना मिटर नसतात त्यांच्यावर कारवाई होते का असा प्रश्न ताम्हणकर यांनी उपस्थित केला आहे.