पणजीत शैलैंद्र वेलिंगकरांना मिळणार संधी
ऑनलाईन टीम / गोवा
आप, भाजप यानंतर आता शिवसेनेने ही आपली उमेदवार यादी जाहीर केली असून सद्या शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९ उमेदवारांचा समावेश आहे.
यामध्ये प्रामुख्याने सुभाष केरक – पेडणे, जितेश कामत – म्हापसा, विन्सेंट परेरा – शिवोली, गोविंद गोवेकर – हळदोणे, शैलेंद्र वेलिंगकर – पणजी, गुरुदास गांवकर – पर्ये, देविदास गांवकर – वाळपई , मारुती शिरगावकर – वास्को, एलेक्सि फर्नांडीस – केपे अशी उमेवार आणि त्यांच्या मतदार संघाची यादी आहे.
गोवा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांनी पणजी येथे पत्रकार परिषद झाली होती. यावेळी गोवा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार असून राष्ट्रीय काँग्रेसला वारंवार प्रस्ताव ठेवूनही काँग्रेसने याबाबत सकारात्मकता न दर्शवता आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे काँग्रेस शिवाय हे दोन पक्ष एकत्र आले असून ताकदीने निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. सध्या कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे निश्चित झाले नसले तरी येत्या दोन ते चार दिवसात आपण हा आकडा जाहीर करणार असल्याची भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली असल्याचे यावेळी राष्ट्रवादीचे वरीष्ट नेते प्रफूल्ल पटेल यांनी स्पष्ट केले होते.