मंत्री मायकल लोबो यांचा इशारा
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात कोरोना व्हायरसचा फैलाव आटोक्यात येत असल्याचे चिन्हे दिसून येत आहेत. आरोग्य खात्याने पुणे येथे पाठविलेली सॅम्पल निगेटीव्ह आल्याने गोमंतकीयांना ही एक जमेची बाजू आहे. मात्र गोवा सरकार त्यापुढेही जाऊन संपूर्ण गोवाच सॅनिटाईझ करण्याचे काम करीत आहेत. गोवा अग्निशामक दलाने बुधवारपासून युद्धपातळीवर हे काम सुरु केले असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
सोडीयम हायपो क्लोराईट हे केमिकल पाण्यात मिसळून त्याची ठिकठिकाणी फवारणी केली जात आहे. ज्या जाग्यावर लोकांची वर्दळ जास्त असते अशा जागांना प्रधान्य दिले जात आहे. या केमिकलमुळे एकाद्या ठिकाणी चुकून कोरोना व्हायरस राहिला तर तो वितळून जातो असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण गोव्यात असणे शक्य असून ते अद्याप आरोग्य खात्यापर्यंत पोचलेलेही नसतील असे लोका सार्वजनिक ठिकाणी आल्यास त्यांच्यातील व्हायरस विविध ठिकाणावर लागणे शक्य आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा पुन्हा फैलाव होऊ शकतो. हे संकट टाळण्यासाठी सोडीयम हायपो क्लोराईटची फवारणी केली जात आहे.
अग्निशामक दलाच्या जवानानी फवारणीला बुधवारपासून सुरुवात केली असून बुधवारी पणजी केटीसी बसस्थानक तसेच सर्व केटीसी बस गाडय़ांवर तसेच गाडीच्या आत फवारणी केली आहे. काल गुरुवारी बाबोळी येथील गोमेकॉत फवारणी केली आहे. ज्या ठिकाणी काही जणांना कॉरोन्टाईन करण्यात आले त्या ठिकाणी म्हणजे वॉर्ड क्रमांक 113, 115, 145, 148 तसेच 118 या ठिकाणी अगोदर फवारणी करण्यात आली आहे. सांताक्रूझ येतील मार्केटमध्येही फवारणीचे काम सुरु आहे. याशिवाय इतर अनेक ठिकाणी फवारणीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. महागडय़ा किमतीचे हे पॅमीकल डेक्कन पॅमीकल या कंपनीने अग्निशामक दलाला दिले आहे.