प्रतिनिधी / पणजी
गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिले जाणारे सुवर्णपदक यावषी अशोक नाईक तुयेकर ऊर्फ कवी पुष्पाग्रज यांना देण्यात येत आहे. यासाठी नेमलेल्या समितीने त्यांच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
पुष्पाग्रज हे गोमंतकातील आणि एकूणच मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचे कॅलिडोस्कोप, नन्रूख आणि शांती अवेदना हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय सूर्यकोटी समःप्रभा हे नाटक, मनःपूत ही कादंबरिका प्रसिद्ध झाली आहे. पुष्पाग्रज हे विनोदी लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे हंसोळी आणि झंप्याची झंपेगिरी हे विनोदी संग्रह प्रकाशित झाले आहेत.
त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. गोवा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. धी गोवा हिंदू असोसिएशनचा बा. भ. बोरकर पुरस्कार, बेळगावचा कै. बाबुराव ठाकूर साहित्य पुरस्कार, नाथ पडवळ प्रतिष्ठानचा शरदश्चंद्र मुक्तीबोध पुरस्कार,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार असे सर्व महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
पेडणे? येथे होणाऱया 28 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.