पारंपरिक पद्धतीने दिवाळी सणाला प्रारंभ : दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी
दिवाळी म्हटली की अगदी सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येते. या दिवाळी सणाच्या पर्वाला ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही दिवाळीसाठी लागणाऱया साहित्य खरेदीची लगबग दिसून येत आहे. कपडे, दागिने, पूजेचे साहित्य, आकाशकंदील, फळे, मिठाई आदींची खरेदी करताना नागरिक दिसत आहेत.
गुरुवारपासून तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये वसुबारस पूजन करून दिवाळीच्या सणाला प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामीण भागात वेगवेगळय़ा पद्धतीने दिवाळीचा सण करण्याची परंपरा आहे. तालुक्मयाच्या पिरनवाडी, बेळगुंदी, हिंडलगा, कणबर्गी, सांबरा, हलगा-बस्तवाड व कंग्राळी खुर्द, कडोली आदी भागातील बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीला उधाण आले आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीनिमित्त काही महिलांनी घरांमध्ये पूजा केली. तर शनिवारी नरकचतुर्थी असून विविध गावातील दुकानांमध्ये लक्ष्मीपूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असले तरीही बेळगाव शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तालुक्मयाच्या काही भागातील बाजारपेठांमध्येही बऱया प्रमाणात साहित्य मिळू लागले असल्याने पिरनवाडी, हिंडलगा, कंग्राळी आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक गणित कोलमडले असल्यामुळे दरवषीच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात साहित्याची खरेदी करण्यात येऊ लागली आहे. ग्रामीण परिसरातील बाजारपेठांमध्ये फराळापासून फटाक्मयांपर्यंत सर्व साहित्य उपलब्ध होऊ लागले आहे. दिवाळी साहित्याबरोबरच कपडे, दागिन्यांची खरेदी करताना अनेकजण दिसत आहेत. रांगोळीचे रंग, कंदील, दिवे आदींसह पूजेसाठी लागणारे ऊस, केळीची लहान झाडे, आदींचीही खरेदी शुक्रवारी करण्यात येत होती.
पिरनवाडीत आकाशकंदील 150 ते 300 रुपये याप्रमाणे विक्री चालू होती. तसेच पाच फळे 70 ते 100 रुपये, रांगोळी लहान वाटी पाच रुपये, पाच ऊस 40 ते 50 रुपये, याप्रमाणे इतर साहित्यही नागरिक खरेदी करीत होते.