प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱया नागरिकांना झोपडपट्टी निर्मूलन योजनेअंतर्गत घेर देण्यात आली आहेत. पण माहिती आणि सर्व्हेक्षण करूनही घरे देण्यात आली नसल्याची तक्रार करून श्रीनगर परिसरातील नागरिकांनी मंगळवारी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. महापालिकेच्या कारभाराचा धिक्कार केला.
गरजूंना आणि रस्त्याशेजारी व खुल्या जागेत झोपडी बांधून राहणाऱया नागरिकांना झोपडपट्टी निर्मूलन योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात येतात. पण सर्क्हेक्षणानंतरही घरे मंजूर करण्यात आली नाहीत. घरांसाठी महापालिकेला अनेकवेळा निवेदने देण्यात आली. पण दखल घेण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी महापालिका कार्यालयासमोर धरणे धरून घरांसाठी ठिय्या आंदोलन छेडले. झोपडपट्टी निर्मूलन योजनेअंतर्गत विविध ठिकाणी बहुमजली इमारतीचे बांधकाम करून घरे देण्यात आली आहेत. काही कुंटूबातील प्रत्येक सदस्यांला घर देण्यात आले आहे. तसेच काही घरांमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. पण अर्ज करूनही घरे देण्यातत आली नाहीत. महापालिका कार्यालयात अनेकवेळा निवेदने दिली, तसेच आश्रय योजना विभागातील अधिकारी व महापालिका आयुक्तांनी भेट घेवून घरे देण्यासाठी निवेदन सादर केले होते. पण याबाबत महापालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांनी आंदोलन छेडले. तातडीने घरे मंजूर करावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात श्रीनगर परिसरातील झोपडपट्टी वासिय मोठयासंख्येने सहभागी झाले होते.