- महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेची मागणी
ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना ही राज्यातील अनेक जिल्ह्यांत असंघटीत क्षेत्रातील कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने, काम करीत आहे.
आपल्या महाविकास आघाडी सरकारकडून असंघटीत घरेलु कामगारांना फार मोठ्या अपेक्षा आहेत, आणी आपले सरकार ते पूर्ण करेल अशी महाराष्ट्रातील लाखो घरेलु कामगार महिलांना खात्री आहे.
सन 2014 पर्यंत घरेलु कामगार महिलांना काही प्रमाणात शासकीय योजनाचा लाभ मिळत होता.परंतू 2014 साली नविन सरकार आल्यापासुन आजपर्यंत, घरेलु कामगारांच्या प्रश्नाकडे, मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र राज्यात या क्षेत्रात प्रामुख्याने महिलां मोठ्या प्रमाणावर काम करतात. महाराष्ट्रात लाखो महिला कामगार विविध जिल्हा, तालुका व शहराच्या ठिकाणी काम करतात.
2014 साली सत्तेवर आलेल्या सरकारने घरेलु कामगार कल्याण मंडळाचे कामकाज पूर्ण:तहा गुंडाळून टाकले त्यामुळे पुर्वी काही प्रमाणात मिळणारे शासकीय योजनांचे फायदे घरेलु कामगारांना मिळणे बंद झाले आहे, त्यामुळे घरेलू कामगार कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत.
शासकीय योजनांपासुन वंचित राहिलेल्या घरेलु कामगारांना त्यांचे न्याय्य मिळवून देण्यासाठी घरेलु कामगार कल्याण मंडळास या अर्थसंकल्पात ( पाचशे कोटी रुपयांची) भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे.