केवळ 2 मिलिमीटर घामाने 20 तासांसाठी वॉच चार्ज होणार
स्मार्टवॉच आता लोकांच्या गरजेचे साधन ठरले आहे. तुमच्या मनगटाला बांधलेल्या वॉचला आता तुम्ही एका दिवसात किती पावले चालतात, किती प्रमाणात व्यायाम केलात, हार्टबीट किती आहे आणि ऑक्सिजनची पातळी किती आहे हे देखील माहिती असते. इतक्या आवश्यक गोष्टीला चार्ज करणे देखील तितकचे महत्त्वाचे आहे. एखाद्या दिवशी याला चार्ज करण्यास विसरलात तर टेन्शन देखील येते. पण आता तुमचा स्मार्टवॉच घामाने चार्ज होईल असे सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाहीत.
पण हे सत्य आहे. वैज्ञानिकांनी स्मार्टवॉचसाठी एक विशेष बॅटरी तयार केली असून जी इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी घामाने चार्ज हेते. ही एक प्रकारची पोर्टेबल बॅटरी असून ती स्पेशल वायरलेस डिव्हाइससाठी तयार करण्यात आली आहे. ही बॅटरी केवळ 2 मिलिमीटर घामाद्वारे 20 तासांपर्यंत स्मार्टवॉच चार्ज करू शकते.
प्लेन बँडेजयुक्त पोर्टेबल बॅटरी
सिंगापूरमध्ये नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीने 0.8 स्क्वेअर इंचाची प्लेन बँडेजयुक्त पोर्टेबल बॅटरी तयार केली आहे. ही बॅटरी एक स्ट्रेचेबल आणि घाम शोषून घेणाऱया कापडाने आच्छादलेली आहे. यात घाम शोषून घेण्यासह घाम साठवून ठेवण्याचीही क्षमता आहे. घाम कमी झाल्यावरही बॅटरी यामुळे सातत्याने काम करू शकते.
वायरलेस गॅझेट्ससाठी संशोधन
हे नवे तंत्रज्ञान परिधान करणाऱया गॅझेट्ससाठी उपयुक्त ठरू शकते. वायरलेस गॅझेट्सच्या चार्जिंगसाठी आणखी नवे संशोधन सुरू असल्याची माहिती नानयांग टेक्नोलॉजीच्या वैज्ञानिकाने दिली आहे. मानवी शरीरातील घाम या बॅटरीला चार्ज करण्यास मदत करतो.
यापूर्वीही अशी उपकरणे
सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या टीमने यापूर्वी विजेशिवाय मोबाईल चार्ज होईल अशाप्रकारे उपकरण तयार केले होते. संशोधकांनुसार झोपतवेळी उपकरण परिधान केल्यावर घामामुळे वीज तयार होईल आणि त्यातून मोबाइल फोन आणि स्मार्टफोन चार्ज होणार आहे. हे उपकरण बोटांना जोडले जाऊ शकते.