लॉकडाउमध्ये घरात राहून एकाकीपणाचे ठरले शिकार
ब्रिटनमध्ये मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळातील लॉकडाउनचा शालेय मुलांवर मोठा परिणाम झाला आहे. ब्रिटनमध्ये आता शाळा सुरू झाल्या आहेत तरीही सव्वा लाखाहून अधिक किशोरवयीन मुले शाळेत जात नाहीत किंवा त्यांचे जाणे अनियमित आहे. अशा मुलांना तेथे ‘घोस्ट चाइल्ड’ म्हटले जातेय. ही मुले कधीतरी किंवा शाळेत दिसतच नाही आहेत.
सध्या अनेक पालक स्वतःच्या मुलांना डॉक्टरांना दाखविण्यासाठी आणत आहेत. कोरोना काळादरम्यान मुलांमध्ये एकाकीपणा आणि लोकांशी मिळण्याजुळण्याचे प्रकार खूपच कमी झाले अशा स्थितीत मुले अंतर्मुख झाली असून स्वतःमध्येच हरवून जाऊ लागल्याचे सायकोलॉजिस्ट डॉ. जेन ग्लीमर म्हणाले.
शाळेत जाण्याची इच्छाच संपली
2020 आणि 2021 दरम्यान ब्रिटनमध्ये अनेकदा लॉकडाउन लागू करण्यात आले. यामुळे अनेक मुलांमध्ये शाळेत जाण्याची आणि शिकण्याची इच्छाच संपली आहे. सेंटर फॉर सोशल जस्टिसनुसार अशा मुलांना मनोचिकित्सेची गरज भासत आहे. किशोरवयीनांवर स्वतःचे आदेश थोपू नका. याऐवजी किशोरवयीयांना आता परत शाळेत जाण्यासाठी प्रेरित करा असा सल्ला डॉ. बॅटिना यांनी दिला आहे.
मुलांशी सातत्याने संवाद साधा
सायकोलॉजिस्ट डॉ. बॅटिना हॉनेन यांच्यानुसार मुले जर शाळेत जाण्यास टाळाटाळ करत असल्यास पालकांनी स्वतःच्या पातळीवरही काही प्रयत्न करावेत. पालकांनी स्वतःच्या मुलांसमवेत सातत्याने संवाद साधावा. त्यांना एकटे वाटू देऊ नका. मुलांना शाळेत न जाण्याचे कारण विचारा. मुलांमध्ये शिक्षणाबद्दल अनिच्छा दिसून येत नसल्यास त्यांना समजाविण्यात यावे.
दबाव टाकू नका
शाळेत जाण्यास टाळाटाळ करणाऱया मुलांवर पालकांनी दबाव टाकू नये. मुलांना शाळेचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रेरित करावे असे डॉ. ग्लीमर यांनी म्हटले आहे.