बहुउद्देशीय हॉल बांधण्याची आमदार राजेश पाटील यांची ग्वाही
कार्वे वार्ताहर
मजरे कार्वे येथील महात्मा फुले विद्यालय व गुरु. म. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेजच्या विस्तीर्ण प्रांगणात चंदगडी नाटय़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले. चंदगड तालुक्मयाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनानंतर चक्रीवादळ व मुसळधार पावसानंतर हा प्रयोग होतो की नाही याची साशंकता असताना जिद्दी संयोजक व तालुक्मयातील हौशी नाटय़रसिक यांच्या प्रयत्नाने मुंबई येथील कलाकारांचा नाटय़प्रयोग ‘बारोमास’ यशस्वीरित्या पार पडला.
प्रारंभी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते नाटय़ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक या नात्याने बोलताना राजेश पाटील म्हणाले, चंदगड तालुक्मयामध्ये आज नाटय़ रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता येथे सध्या एका नाटय़गृहाची आवश्यकता भासत आहे. यशवंतनगर येथे कै. नरसिंगराव पाटील यांचे स्मारक व्हावे. अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा होती. त्या ठिकाणी बहुउद्देशीय हॉल बांधून त्यांचे स्मारक करण्यात येईल. यापुढेही नाटय़ चळवळ यशस्वी होण्यासाठी जे लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही देत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक चंदगडी नाटय़ महोत्सवाचे प्रमुख प्रा. परसु गावडे यांनी करून नाटय़ महोत्सव आयोजित करत असताना येत असलेल्या अडचणी व त्यातून समाजातील सर्व स्तरातून होत असलेली मदत याविषयी संपूर्ण लेखाजोगा मांडला. यावेळी डॉ. नंदकुमार मोरे यांनी चंदगड तालुक्मयाला नाटकांची संस्कृती आहे चित्रपटासारख्या व नाटकासारख्या माध्यमातून चंदगड चे नाव देशात आदराने घेतले जावे, नवोदित कलाकारांना राज्यस्तरीय नाटके पाहता यावीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. एम. एम. तुपारे यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास कारवेचे सरपंच शिवाजी तुपारे, उपसरपंच पांडुरंग बेनके, प्राचार्य एम. एम. गावडे, नितीन पाटील उपस्थित होते. ठाणे येथील नाटय़ संस्थेमार्फत सादर करण्यात आलेले “बारोमास” हे नाटक यावेळी सादर करण्यात आले. भर पावसानंतर येथील रसिकांनी या नाटकाचा मनापासून आस्वाद घेतला व कलाकारांना दाद दिली. आभार प्राचार्य आर आय पाटील यांनी मांडले.12 सीएचए 2, मजरे कार्वे