चंदुर / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे आज नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये चंदुर गावभाग येथील 40 वर्षीय महिला,त्यांचे एक वर्ष लहान मुल, शाहूनगर येथील पंचवीस वर्षे महिला, त्यांची वय वर्षे तीन व आठ अशी दोन मुले ,गावभाग आंबेडकर पुतळा येथील 65 वर्षीय पुरुष व त्यांचा त्तीस वर्षे मुलगा, त्याचबरोबर गावातील आरोग्य विभागातील तीस वर्षे आरोग्य सेविकेला आज कोरोनो झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावातील एकूण आकडा 44 वर गेलेला आहे.बाधित भागात चंदुर ग्रामपंचायत औषध फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करत आहे व वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता गाव तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीने दिले आहेत.