वार्ताहर /पारोडा
पर्वत-पारोडा, केपे येथील श्री चंदेश्वर भूतनाथ संस्थानातील वार्षिक महाशिवरात्री उत्सव मंगळवार 1 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून अभिषेकाचा कार्यक्रम मात्र मर्यादित स्वरूपात होणार आहे. यंदाचा हा उत्सव अवेडे येथील गावस देसाई वांगडी यांच्यातर्फे साजरा होणार आहे. या दिवशी श्रींच्या दर्शनासाठी मंदिर संपूर्ण दिवस भाविकांसाठी खुले असणार आहे. कोविडमुळे उत्सवातील कार्यक्रमांवर मर्यादा घालण्यात आल्या असून सर्वांनी कोविड नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन श्री संस्थान समितीने केले आहे.