– गोकुळने जागा खरेदीचा फेर विचार करावा –संचालक चेनत नरके यांचे विश्वास पाटलांना आवाहन
प्रतिनिधी/कोल्हापूर
साधी चहाची टपरी टाकतानाही हजार वेळ विचार केला जातो. ग्राहक मिळेल का, गुंतवलेले भांडवल परतफेड होणार कशी यावर चर्चा होते. गोकुळच्या विस्तारीकरणासाठी तर 324 कोटींची गुंतवणूक आहे. यावर साधी चर्चाही नाही. अशा शब्दात गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी सत्ताधाऱयांच्या कारभावर नाराजी व्यक्त केली. जागा खरेदी आणि 324 कोटींची गुंतवणूक गोकुळला अडचणीत आणू शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. महाडिक यांनी मांडलेली भूमिका गांभिर्याने घ्यावी, राजकारण करु नका असा सल्लाही त्यांनी दिला.
युथ बँक येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, गोकुळमध्ये सत्ताधारी विरोधक असा भेदभाव असू नये, उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून आपण सर्व एकच आहोत. अशी भूमिका असतानाही संचालकांचे ऐकलं जात नाही. याची खंत वाटते. त्यामुळे आम्हाला वरिष्ठ नेत्यांकडे जावे लागते. अशा शब्दात नरके यांनी चेअरमन विश्वास पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळेच शौमिका महाडिक यांना पत्रकार परिषद घेऊन जाहीर भूमिका घ्यावी लागली.
ते म्हणाले, संचालक मंडळाच्या बैठकीत विरोधी आघाडीच्या संचालकांना जुमानले जात नाही. सभेमध्ये झालेल्या चर्चेचे मिनिट घेत नाहीत. अशी टिका करत त्यांनी जागा खरेदीवर आक्षेप घेतला. इतकी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी हचारवेळा विचार करायला पाहिजे. विस्तार झाला पाहिजे यासाठी पायभूत घटक आपल्याजवळ पाहिजेत. पण त्यासाठी गुंतवणूक कशी केली पाहिजे याचा डीपाआर झाला पाहिजे. भविष्यात येणाऱया अडचणी लक्षात घेतल्या पहिजेत. पण तसे होताना दिसत नाही. फुलटाईम वेळ देणाऱयांनी यावर सविस्तर अभ्यास केला पाहिजे. अन्यथा ही गुंतवणूक मोठी चूक ठरु शकते. आणि यातून संघ कधाही सावरणार नाही. 20 लाख दूध संकलन होणार असे सांगून ही गुंतवणूक केली जात आहे, पण 20 लाखांचा टप्पा कधी पूर्ण होईल हे ठामपणे सांगितले जात नाही. अशी टिका केली.