प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील गोडबोले स्टॉप येथे चालकाचा ताबा सुटल्याने रत्नागिरी-वरवडे जाणारी एसटी बस गटारात जावून अपघात झाल़ा ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडल़ी सुदैवाने या अपघातात कुणीही प्रवासी जखमी झाले नाह़ी मात्र बसचे उजवीकडील भाग गटारात अडकून पडल्याने मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होत़ा अखेर क्रेनच्या सहाय्याने बसला बाहेर काढण्यात एसटी प्रशासनाला यश आल़े
एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता रत्नागिरी-वरवडे ही बस (एमएच 14 बीटी 0013) बसस्थानकातून मार्गस्थ झाली होत़ी शहरातील गोडबोले स्टॉप येथे चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा उजवीकडील भाग गटारामध्ये गेल़ा गोडबोले स्टॉप ते उद्यमनगर येथे रस्त्याकडेला खोदकाम सुरू असल्याचे चालकाचे नियंत्रण सुटले, असे सांगण्यात आले. या अपघातग्रस्त बसमध्ये केवळ 5 प्रवासी होत़े सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाह़ी एका बाजूला झालेले खोदकाम व बस अडकून पडल्याने गोडबोले स्टॉप ते उद्यमनगर रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे बंद झाली होत़ी दरम्यान पेनच्या सहाय्याने बसला बाहेर काढण्यात आल़े या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े पुढील तपास करण्यात येत आह़े