कोल्हापूर शहर, इचलकरंजीत सर्वाधिक रुग्ण
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची गेल्या आठवडाभरापासून वाढत असलेली रुग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे. मंगळवारी जिल्ह्य़ात नवे 37 रुग्ण आढळून आले. यामध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक 18 तर इचलकरंजीमध्ये सात रुग्ण आढळले. त्याचबरोबर भुदरगड, कागल तालुक्यात प्रत्येकी दोन, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. तसेच मुंबईहून आलेले तीन आणि सिंधुदूर्ग येथून आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.
|
जिल्ह्य़ातील कोरोनाचा संसर्ग गेल्या तीन महिन्यांपासून अटोक्यात आला होता. डिसेंबरच्या सुरवातीला जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी स्थिती होती. मात्र यानंतर रुग्णसंख्येत चढउतार राहिला. डिसेंबर अखेरीस सक्रीय रुग्णसंख्या 52च्या आसपास होती. मात्र यानंतर पुन्हा कोरोना संसर्गाने वेग घेतला. दिवसभरात मिळणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत गेली. मंगळवारी दिवसभरात नवे 37 रुग्ण मिळाले. तर दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्या 172 इतकी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे