ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एका दिवसात कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात राज्यात 2347 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या त्यामुळे आता 33 हजार 053 अशी झाली आहे. तर कालच्या दिवसात 63 जणांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत एकूण 1 हजार 198 जणांनी आपला जीव गमावला आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट द्वारे दिली.
ते म्हणाले, गेल्या चोवीस तासात 600 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आता पर्यंत 7688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 24 हजार 161 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
काल झालेल्या 63 मृत्यूंपैकी मुंबईत 38, पुण्यात 9, औरंगाबादमध्ये 6, सोलापूरमध्ये 3, रायगडमध्ये 3, ठाणे, पनवेल, लातूरमधील प्रत्येकी एक आणि अमरावती शहरात एक असा मृत्यू झाला आहे. यामध्ये 44 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, प्रयोग शाळेत पाठवलेल्या 2 लाख 73 हजार 239 नमुन्यांपैकी 2 लाख 40 हजार 186 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 33 हजार 53 जण पॉझिटिव्ह आले आहेत.