प्रतिनिधी/ चिकोडी
चिकोडी तालुक्मयात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी चुरशीने 84 टक्के मतदान झाले. तालुक्मयातील 1628 उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद करण्यात आले.
तालुक्मयातील 35 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले. तालुक्मयात 36 ग्रामपंचायती असून जनवाड या ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने उर्वरित 35 ग्राम पंचायतींसाठी 224 प्रभागातील 302 मतदान केंद्रावर मतदान झाले. मतदारांनी उत्साहाने मतदान केले. तालुक्मयात 1 लाख 4 हजार 993 पुरुष व 1 लाख 1 हजार 187 महिला अशा एकूण 2 लाख 6 हजार 120 मतदारांपैकी 89 हजार 377 पुरुष व 84 हजार 782 महिला अशा एकूण 1 लाख 74 हजार 159 मतदारांनी मतदान केले. मतदानात पुरुषांनी आघाडी घेतली असून त्यांची टक्केवारी 85 टक्के तर महिलांची टक्केवारी 84 टक्के तर एकूण मतदानाची टक्केवारी 84 झाली आहे.
केरुर येथे निवडणूक विभागाच्यावतीने सामाजिक अंतराचे नियम पाळण्यासाठी जमिनीवर आरेखन करण्यात आले होते. पण आरेखन केवळ शोभेसाठी असल्याचे व सर्व मतदार शाळेच्या वऱहांडय़ातच रांगा लावून उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. निवडणूक विभागाने एक हजारावर मतदार असलेल्या अनेक मतदान केंद्रांचे विभाजन केले असल्यामुळे अशा मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या अत्यल्प होती.
सकाळच्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याने दुपारनंतर या मतदान केंद्रासमोर कर्मचारी मतदारांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर 700 हून अधिक मतदार असलेल्या केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा पहाण्यास मिळाल्या.
सकाळी सातपासूनच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. सायंकाळी पाचपर्यंत ही प्रक्रिया करण्यात आली. कांही ठिकाणी मतदार रांगेत असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. प्रामुख्याने या निवडणुकीत महिला, युवक वर्गाने अत्यंत उत्साहाने मतदानात भाग घेतला. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हय़ातील पहिल्या टप्प्यात निवडणुका झालेल्या भागातील पोलीस अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा चिकोडी तालुक्मयात तैनात करण्यात आला होता. जोडकुरळी वगळता अन्य कुठेही इतका मोठा पोलीस फौजफाटा पाहण्यास मिळाला नाही. तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, तालुका वैद्याधिकारी अशा अधिकाऱयांचे पथक जोडकुरळी येथेच ठाण मांडून होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतपेटय़ा बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतपेटय़ा आर. डी. महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये जमा करून त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या.