बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात पूर्ण लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस चौकशी करताना दिसत आहेत. दरम्यान चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात तपासणी दरम्यान कर्नाटक पोलिसांनी बुधवारी दोन मोटरसायकलवरून जाणाऱ्या चार जणांना अडवून चौकशी केली असता त्यांच्याकडून एक हजार जिलेटिनच्या कांड्या आणि ६०० इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे रमेश (वय ३५), व्यंकटेश (वय ३२), वेणू (वय २०) आणि यादगिरी (वय ३०) अशी आहेत. तिघे तेलंगणाच्या नलगोंडा येथील रहिवासी आहेत.
“आरोपी तीन वेगवेगळ्या बॅगमध्ये १ हजार जिलेटिन स्टिक आणि ६०० इलेक्ट्रॉनिक डेटोनेटरसह दोन मोटारसायकलवरून प्रवास करीत होते. त्यांनी असा दावा केला की हे स्फोटक साहित्य त्यांनी मदनपळ्ळीतील एका मासिकाच्या मालकाकडून खरेदी केले होते आणि त्याचा वापर त्या भागातील शेतातील दगड फोडण्यासाठी करण्यात येणार होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना अधिक तपासासाठी थांबविण्यात आले होते, ”असे पोलीस अधीक्षक जी. के. मिथुन कुमार यांनी सांगितले आहे.