वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टय़ुनेशिया येथे झालेल्या विश्व युवा टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या महिला टेबल टेनिसपटू दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांनी मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटात दुहेरीचे उपविजेतेपद पटकाविले.
19 वर्षांखालील वयोगटाच्या मुलींच्या दुहेरीत चितळे आणि घोष यांनी झेकच्या झेडेरोव्हा आणि क्रोएशियाची ऍरापोव्हिक यांचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. त्यानंतर अंतिम फेरीत रशियाच्या नातालिया मॅलिनिना आणि एलिझाबेथ अब्रामेन यांनी चितळे आणि घोष यांचा 11-3, 11-6, 11-7 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटात एकेरीमध्ये भारताच्या दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. उपांत्य सामन्यात रशियाच्या व्होरोनिनाने चितळेचा 11-8, 7-11, 6-11, 11-8, 11-7 तसेच दुसऱया उपांत्य लढतीत तुर्कीच्या हॅरेकने घोषचा 11-8, 4-11, 11-9, 3-11, 11-6 असा पराभव केला.