बेंगळूर:प्रतिनिधी
चित्रदुर्ग जिल्ह्यात नव्याने वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय बांधण्यासाठी सरकारने २० एकर जागा दिली आहे. या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर यांनी शुक्रवारी केली.
यावेळी राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई, चित्रदुर्गाचे खासदार ए. नारायणस्वामी आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांनी मंत्र्यासमवेत येऊन ठरलेल्या जागेवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाविषयी त्यांनी त्या योजनेची माहिती दिली.