ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
चिनी सैन्याने मध्यरात्री भारताच्या सीमेजवळील झिंनजियान प्रांतात युद्धसराव करत पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाख जवळ असणाऱ्या चीनच्या झिंजियान प्रांतात मध्यरात्री 16,000 फूटांवर युद्धसराव केला. पूर्व लडाखमधील सीमावादावरुन दोन्ही देशात असलेला तणाव निवळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सीमावादावर शांततेत तोडगा काढण्याच्या निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. मात्र, अशा प्रकारे भारताला वारंवार डिवचणाऱ्या चीनचा खरा चेहरा जगासमोर येत आहे. चीनकडून मध्यरात्री हा युद्धसराव करण्यात आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.