वाहन डिलर संघटना फाडाचा अंदाज – कोरोनासह अन्य घटकांचा परिणाम शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिपच्या कमतरतेमुळे उत्सव काळातील प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री प्रभावीत होणार असल्याचे संकेत वाहन डिलर्सची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) यांनी व्यक्त केले आहेत.
सदरच्या कालावधीत सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे वाहन कंपन्या डिलरपर्यंत वाहनांचा पुरवठा करण्यासाठी संघर्ष करत आहेत. फाडाकडून सेमिकंडक्टरच्या कमतरतेमुळे विशेष स्वरुपात प्रवासी वाहनांसाठी डिलर्सकरीता सण उत्सवाच्या कालावधीचा सीझन थंड राहण्याचा अंदाज आहे. या कारणास्तव डिलर्सकडे अतिरिक्त साठा उपलब्ध होणार नसल्याची माहिती आहे.
साधारणपणे जागतिक पातळीवरील वाहन उद्योगांमध्ये सेमिकंक्टरचा प्रयोग अतिशय वेगाने होत आहे. तंत्रज्ञानात आणि नवीन मॉडेल्समध्ये अधिक प्रमाणात इलेक्ट्रॉनिक फिचर्सकरीता सेमिकंडक्टरचा प्रयोग अतिशय वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. चिपच्या पुरवठय़ावरच वाहनांचा आगामी प्रवास निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
डिलर्ससाठी संघर्षाचा काळ
वाहन डिलर्सना आपल्या व्यवसायाला संघर्षपूर्ण कालावधीमधून प्रवास करावा लागत आहे. कोरोना महामारीचा प्रभाव आजही बाजारात असल्याचे दिसून येत असल्याचे फाडाचे अध्यक्ष विन्केश गुलाटी यांनी म्हटले आहे.
अन्य नोंदी
सेमिकंडक्टरच्या एकूण मागणीत वाहन उद्योगाचा हिस्सा 10 टक्के आहे.