धामणवणेतील घटना, परस्परविरोधी तक्रारी, 25जणांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण
मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या वादानंतर पुन्हा झालेल्या भांडणामुळे दोन गटात लाठय़ा-काठय़ानी मारामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी दोन्ही गटांतील व्यक्तीनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून एकूण 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मारामारीत एक 16 वर्षिय बालक जखमी झाला आहे.
याप्रकरणी सोमा सीताराम बेंडके (62, धामणवणे-शिगवणवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील पांडुरंग शिगवण, बबन कृष्णा शिगवण, गजानन कृष्णा शिगवण, जनार्दन कृष्णा शिगवण, काशिराम गोपाळ शिगवण, पर्शुराम भिकाजी शिगवण, समीर शांताराम शिगवण, रुपेश मनोहर शिगवण, नामदेव बबन शिगवण, चेतन शांताराम शिगवण, सुभाष बाबल शिगवण, रवींद्र लक्ष्मण शिगवण, जनाबाई राजाराम शिगवण, सुशीला गजानन शिगवण (सर्व धामणवणे) हे 14जण व फिर्यादी सोमा बेंडके यांच्या कुटुंबात कौटुंबिक कारणावरुन मागील वर्षभरापासून वाद सुरु आहे. गुरूवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास धामणवण-शिगवणवाडे येथे झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सोमा बेंडके तसेच साक्षीदार यांना बेकायदेशिर जमाव करुन हातातील लाकडी दांडक्याने व लाथा-बुक्क्यांनी मारहण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वरील 14जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राजाराम कृष्णा शिगवण (63, धामणवणे-शिगवणवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व सोमा सीताराम बेंडके, अनिल सोमा बेंडके, अनंत सोमा बेंडके, सुनिता सोमा बेंडके, विकास बेंडके, राजा अशोक बेंडके, बंडय़ा अशोक बेंडके, वसंत पांडुरंग बेंडके, महेश वसंत शिगवण, पांडय़ा बबन उदेग, रंजन लक्ष्मण उदेग (सर्व धामणवणे-शिगवणवाडी) या 11जणांमध्ये कौटुंबिक वाद चालू आहे. शुक्रवारी संध्यानकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल-रखुमाई मंदिर याठिकाणी राजाराम शिगवण हे आपल्याला शिविगाळ करीत असल्याचा गैरसमज सोमा बेंडके यांनी करुन घेतला. तसेच वरील गुन्हा दाखल झालेल्यानी बेकायदेशिर जमाव करुन राजाराम शिगवण यांच्या घरात प्रवेश करुन शिविगाळ करुन लाथ्या बुक्क्यांनी व लाठय़ा-काठय़ांनी शिगवण यांना मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी या 11जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.