प्रतिनिधी / चिपळूण
एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पाऊसही कहर करत आहे. आज जिल्ह्यात चिपळूण आणि खेड तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा यावेळी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. चिपळूण तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यात गर्मीही वाढली होती. अखेर संध्याकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विशेषतः चिपळूण तालुक्यातल्या खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. भिले, केतकी, मालदोली, चिवेली, कालुस्ते या गावांसह इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. मात्र या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे. कारण आंबा आता कुठे तयार होऊ लागला आहे, पण या पावसामुळे आंबा खराब होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.