ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडल्याने चीनमधील अमेरिकन उद्योग इंडोनेशियात हलविण्याचे प्रयत्न अमेरिकेने सुरू केले आहेत. यादृष्टीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोकोवि यांच्यात गुप्त चर्चा सुद्धा झाली आहे, अशी माहिती इंडोनेशियन सरकारमधील मंत्री लूहट बिनसार यांनी माहिती दिली.
लूहट बिनसार म्हणाले, चीनमधील अमेरिकन कंपन्यांचे मोठे प्रकल्प इंडोनेशियामध्ये हलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी इंडोनेशियातसुद्धा विशेष आर्थिक क्षेत्र सज्ज झाले आहेत. इंडोनेशियात औषध क्षेत्रात गुंतवणुकीसंबंधी असलेल्या संधींबद्दल जोकोवि व ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. इंडोनेशिया मध्य-जावामध्ये 4 हजार हेक्टरची जमीन तयार ठेवणार आहे. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी मला राष्ट्राध्यक्ष जोकोवि यांनी ट्रम्प यांच्या सहकार्यांसोबत चर्चा करण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने आमचे काम सुरू असल्याचे बिनसार यांनी सांगितले.