पोलीस अधिकाऱयांना केल्या सूचना : कडक बंदोबस्त ठेवण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. दि. 22 व 27 डिसेंबर अशा दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 22 रोजी होणाऱया निवडणुकांसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून आता आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेळगाव तालुक्मयातील आचारसंहिता नोडल अधिकारी व तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी चेकपोस्टची पाहणी केली आहे.
बेळगाव तालुक्मयातील तीन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. बाची, बेकिनकेरे, राकसकोप या ठिकाणी हे चेकपोस्ट उभारण्यात आले असून गोवा येथून येणाऱया मद्यसाठय़ावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचबरोबर मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी व आचारसंहिता भंग करणाऱयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना कलादगी यांनी पोलीस अधिकाऱयांना केल्या.
तालुक्यातील तिन्ही चेकपोस्ट नाक्मयांवरील पाहणी करून पोलीस अधिकाऱयांना त्यांनी सूचना केल्या. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याचबरोबर रात्रंदिवस कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ग्राम पंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य उत्पादन करणाऱया आणि गोवा येथून बनावट दारूसाठा आणणाऱयांवर अबकारी खात्याकडून कडक पोलीस पहारा ठेवण्यात यावेत, असेही सांगण्यात आले.
काही चेकपोस्टवर पोलीस नसल्याची तक्रार मल्लिकार्जुन कलादगी यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे त्यांनी तातडीने संबंधित चेकपोस्टचा पाहणी दौरा केला आहे व अबकारी विभागातील पोलीस अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये मोठय़ा प्रमाणात मद्याची ने-आण होणार आहे. त्यामुळे कडक बंदोबस्त ठेवण्यात यावा, असेही सांगण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी प्रकाश कुडची, सेपेटरी सुतार व अबकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते..