28 लाखाचा मुद्देमाल जप्त मुंबईत केली होती अटक
प्रतिनिधी / पणजी
पणजी पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक कलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. चोरी प्रकरणातील संशय़ित मोहम्मद इर्फान उर्फ राबीनहुड (32 बिहार) याला पणजी पोलिसांनी मुंबईत अटक केली होती. त्याच्याकडून 28 लाख रुपये किमंतीचे सोन्याचे हिऱयाचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरी बाबत दोनापावला येथील एका बंग्लो मालकाने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने 27 एप्रिल रोजी मध्यरात्री 2.45 ते 3.25 दरम्यान संशय़िताने बग्लोमध्ये स्वयंपाक खोलीच्या दरवाजातून प्रवेश केला व बंगल्यात असलेल्या सुमारे 30 लाख रुपये किमंतीचे दागिने तसेच इतर ऐsवज लंपास केल्याचे तक्ररीत म्हटले होते.
पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भादंसं 457 व 380 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. तक्रारीचा तपास करीत असताना संशय़ित मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पणजी पोलिसांनी त्वरीत एक पथक मुंबईला पाठविले व संशयिताला मुद्देमालासह ताब्यात घेतले. नंतर ट्रन्जिस्ट रिमांडवर त्याला गोव्यात आणून रितसर अटक केली व न्यायालयात हजार केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.